You MUST Visit Pujya Samirdada's Blog - http://aniruddhafriend-samirsinh.com

Saturday, February 1, 2020

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संग सोहळा

आज ३१ जानेवारी ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संगा’च्या कार्यक्रमाला बरोबर १ महिना पूर्ण झाला. आज अगदी सकाळपासून त्या दिवशीच्या सर्व शेड्युल्ड आठवतेय. आधी अनेक दिवसांपासून ३१ डिसेंबरचे वेद लागलेलेच होते. पण त्या दिवशी सकाळपासून तर आपापल्या घरात जी लगबग चालू होती तीच आज मला प्रकर्षाने आठवत आहे. त्याबरोबरच संपुर्ण सोहळ्याची म्हणजेच प्रत्येक अभंग, त्या सुंदर अभंगांचे ते अप्रतिम बोल, ते गायकांचे मधुर आवाज, ते अथक प्रयत्नाने बनवून स्क्रिनवर दाखविण्यात आलेले व्हिडिओज्‌ आणि फोटोज्‌, ते आदर्श मॅनेजमेन्ट आणि सर्वांवर कळस म्हणजे बापूंचे ते दमदार आगमन, त्याचे ते नाचणे आणि त्यांनी दिलेले आशिर्वाद सर्वच जसेच्या तसे अजुनही डोळ्यासमोर आहे. 





आज एक महिना पुर्ण झाला तरी अजुनही अगदी आताच एक-दोन दिवस झाले असल्यासारखे सगळे जसेच्या तसे नजरे समोर आहे आणि ते नजरेसमोरुन जाऊही नये असे वाटते.

असे सोहळे परत परत होऊन आम्हा सर्व श्रद्धावानांना अशा सर्व अभंगांच्या धुंदीतच रहायची संधी मिळावी यासाठी मोठ्या आईच्या चरणी ‘स्वस्तिक्षेम संवादम्‌’ मार्फत प्रार्थना करीतच आहोत. मला खात्री आहे आपले लाडके डॅड आणि मोठी आई नक्की आमची इच्छा पुर्ण करतीलच.

Saturday, January 4, 2020

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संग सोहळा

हरि ॐ

३१ डिसेंबरची रात्र ही सर्वच लोकांसाठी फार महत्वाची आणि आनंदाची असते. नववर्षाचे स्वागतासाठी सर्वच जण आपापल्या पद्धतीने #आनंद साजरा करतच असतात. आपण श्रद्धावानही जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत हे नेहमीच आपल्या लाडक्या डॅडच्या सुचनेप्रमाणेच करीत आलेलो आहोत. पण या वर्षीची पर्वणी काही औरच होती. कारणही तसेच आहे - ३१ डिसेंबर रोजी डी. वाय पाटील स्टेडियम येथे ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्याच्या अभंगाच्या कार्यक्रमात अत्यंत कनवाळू आणि अकारण कारुण्याचे स्तोत्र असलेले आपले लाडके डॅडच आपल्यासोबत नववर्षाच्या जल्लोषात सहभागी झाले होते.














त्या कार्यक्रमाचे शब्दात वर्णन करणे शक्यच नाही तो अवर्णनीय असाच होत. तरीही सांगावेसे वाटते की -
  • सर्वात महत्वाचे लाडक्या डॅड चे दमदार आगमन, त्याचे ते अभंगावर नाचणं, त्याने दिलेले आशिर्वाद, त्याचे ते हावभाव या सर्वामुळे अगदी सर्व अडचणी, दु:खावर मात करून प्रत्येकाच्या नसनसात एकदम चैतन्य संचारले. 
  • बापूंवर असणारे अभंग मग ते सर्व सुंदर असणारच. 
  • त्यात अभंग रचनाही आफलातून. गायकांनी गायलेही छान. 
  • प्रत्येक अभंगासाठी ऍनिमेशन आणि त्याची कल्पना केली होती तीही खूप छान होती ज्यायोगे त्या अभंगाची किमया आणखीनच वाढत होते. कार्यक्रमासाठीची घेतलेली प्रचंड मेहनतही कार्यक्रम अनुभवताना दिसून येत होती. 
  • प्रत्येक अभंगाच्या आधी असलेले निवेदन ही सुंदर.
  • शिवाय प्रत्येक श्रद्धावानही अत्यंत शिस्तबद्धतेने वागत होत. 

पण आम्हा श्रद्धावानांचे मन नेहमीच अजून काही पाहिजे असेच असते जसे दिल मांगता है मोअर. सो आता स्वस्तिक्षेम मधे मोठ्या आईकडे मागावेसे वाटते की असे कार्यक्रम होतच रहावे आणि आम्हाला असेच परत परत अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’च्या जल्लोषात न्हाऊन जाण्याची संधी मिळावी. आधी ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ आणि आता ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ हा कार्यक्रम झाला. इजा आणि बिजा झाले आता तिजा आणि त्यापुढे असे अनेक येतच रहावे ही बापूंचरणी प्रार्थना.

आहाहा काय पर्वणी होती ती. तो कार्यक्रम ३१च्या रात्री झाला असला तरी अजूनही त्याच धुंदीत आहोत असे वाटते. जय जगदंब जय दुर्गे।


आनंदाचे डोही आनंद तरंग... त्या प्रत्येक अभगाची गोडी अशीच अविरत तरंगत राहो.

आणि मुख्य म्हणजे ज्या ज्या श्रद्धावानांना हा अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्यच्या महासत्संगाच्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती त्या त्या प्रत्येक श्रद्धावानाला त्याने कार्यक्रमासाठी आणले. अगदी अनेक संकटावर मात करून चिडीच्या पायाला दोर लावल्याप्रमाणे त्याने खेचून आणले.

एकंदरीत पुर्ण कार्यक्रमच एकदम शिस्तबद्धतेने, उत्साहात, जल्लोषात, आणि मुख्य म्हणजे भक्तीभाव चैतन्यात ओत प्रोत न्हाऊन निघणारा असा झाला. या कार्यक्रमाची तुलना कशासीही करता येणारच नाही.


आनंद माझा आहे, कारण सत्‌च्चिदानंद माझा आहे.

|| हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ, नाथसंविध ||