साहित्य - तांदळाचे एकदम बारिक पिठ, नारळ, खजूर, काजू, बदाम, वेलची पावडर
पुर्वतयारी - प्रथम नारळ खवून किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यावा, खजूराच्या बिया काढून टाकाव्या, काजू आणि बदामाची जाडसर पूड करावी, जेवढे पिठ त्याच्या एक चतुर्थाऊंश पाणी जास्त घेऊन त्याची उकड काढावी.
कृती - एएका वाडग्यामध्ये खोबरे परतून घ्यावे, त्यात काजू-बदामाची पूड, वेलची पावडर टाकावी आणि थंड करून घ्यावे. नंतर त्यात बिया काढलेले खजूर टाकून फुड प्रोसेसर मधून मिक्स करून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये केले तरी चालेल परंतु एकदम थोडेसेच फिरवावे. हे झाले आपले मोदकाचे पुरण तयार.
आता पिठाला थोडा पण्याचा हात लावून चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याची छोटी पोळी लाटावी आणी त्यावर पुरणाची गोळी ठेवावी. आणि सर्वबाजून दुमडून कळ्या घ्याव्या मोदकाला जितक्या कळ्या जास्त तितके दिसायला छान वाटते. असे वळलेले मोदक इडलीच्या भांड्यात किंवा कुकरमध्ये घालून २० मिनिटे वाफवून घ्यावे. आपले मोदक तयार.
टीप्स् -
- तांदळाचे पिठ जेवढी बारीक पावडर असतील तेवढे मोदकाचे आवरण पातळ बनते.
- तांदळाचे पिठ वाफवताना जितके सॉफ्ट करू तेवढे मोदक सॉफ्ट होतात.
- मोदक वळण्यासाथी तांदळाच्या पिठाचे खोलगट भांडे बनवून त्यातही पुरण भरू शकतो परंतु जर मोदकाला कळ्या जास्त हव्या असतील तर छोटी पोळी लाटून बनवावी.
- नेहमी मोदक खाताना मोदकाच्या वरच्या भागात फक्त पिठ लागते तसे नको असल्यास मोदकाच्या आकाराचाच पुरणाचा गोळा बनवावा ज्याला मोदकासारखे वर टोक असावे परंतु हे टोक एकदम निमुळते बनवावे.
- पुरण बनविताना जितके गोड हवे तितक्या प्रमाणात खजुराचे प्रमाण ठेवावे.
No comments:
Post a Comment