॥ हरि ॐ ॥
‘डिजिटल फोर्ट्स’ हे पुस्तक वाचून झाल्यावर मग डॅन ब्राऊनची एकूण चार पुस्तके आहेत आणि बापूंनी ती चारही वाचायला वाचायला सांगीतले ते मला कळले.... म्हणून पुढच्या तिन पैकी कुठले मिळते ते पाहू लागली परंतु तेव्हा ती तिनही पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती.....
शेवटी एक दुसरेच पुस्तक हाती लागले..... तेही म्हटले वाचावे जोपर्यंत ती तीन पुस्तके मिळत नाही तोपर्यंत हे वाचून काढावे म्हणून सुरू केले..... ते म्हणजे
अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक - ‘नॅनोदय’
२) ‘नॅनोदय’
२८२ पानांचे हे पुस्तक लिहीताना लेखकांनी खूप प्रयत्न घेतले असल्याचे दिसून येते..... तसेही मी असे ऐकले की हे लेखक आधीच चांगल्या पुस्तकांसाठी फेमस आहेत.... पण मी काही पुस्तके न वाचल्याने त्याचा अनुभव घेतला नव्हता तो आता घेतला..... हे पुस्तक लिहीण्यासाठी त्यांनी ५२ पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे....
या पुस्तकाबद्दल मी काय म्हणावे.... खूप छान असे माहीतीपर असलेले हे पुस्तक आहे.... अगदी या क्षेत्राचा काहीही गंध नसलेल्यांनाही हे पुस्तक सहजपणे कळून येते..... इतक्या सोप्या भाषेत आणि सुंदरपणे सादर केलेले आहे... वाचताना प्रत्येकवेळी कुतूहल मिश्रीत शंका सुद्धा वाटायच्या..... खरचं शक्य होईल का हे सर्व..... पण एक मात्र नक्की कळून चूकले की नॅनोटेक्नॉलॉजी ही आता हळू हळू विस्तृत होत चालली आहे..... त्याचे महत्वही खूप वाढले आहे..... नॅनोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांना तर याबाबतीत खात्रीच आहे.... ते अगदी जोमाने कामाला लागले आहेत.... आपल्याला याची फारशी कल्पनाही नव्हती.... निदान मला तरी नव्हती....
सुक्ष्मातीत सुक्ष्म कणांचा प्रताप आहे हा....
मी तर या पुस्तकामुळे नॅनोटेक्नॉलॉजीने एकदम भारावून गेले आहे.... मला एकदम स्वप्नातच असे काही पहाते असेच वाटले.... पुस्तकाचे नाव ‘नॅनोदय’ आणि त्याच्या लगेचच खाली लिहीले आहे ‘नॅनोटेक्नॉलॉजींच्या अतिसूक्ष्म दुनियेची रोमहर्षक सफर’..... त्या प्रमाणेच माझी ही रोमहर्षक सफरच झाली आहे.... खूप छान वाटले हे पुस्तक वाचून आणि मी त्या येऊ घातलेल्या नॅनो जगताची आतुरतेने वाट बघणार आहे.....
हे पुस्तक वाचले आणि लगेचच एका गुरुवारी बापूंनी नॅनोटेक्नॉलॉजीचा उल्लेख केला..... तेव्हा असे वाटले खूप बरे झाले मी हे पुस्तक वाचले.....
॥ हरि ॐ ॥