हरि ॐ
कालच आत्मबलचे स्नेहसंमेलन झाले... आहाहा काय स्नेहसंमेलन होते ते.... अजूनही ती धूंदीच उतरली नाही... आणि उतरुही नये असेच वाटते... काय तो आईचा उत्साह, काय ते आईला आपल्या आत्मबलच्या लेकींचे कौतूक सर्व काही मस्तच होते.... प्रत्येकीच्या प्रत्येक चांगल्या अभिनय आणि वाक्यालाही कीती खूष होत होती आई. बापूही आपल्या लेकींचे मस्त कौतूक करत होते ते पाहून तर आईला आपल्या लेकींचा आणखीनच अभिमान वाटत होता. मलाही २०००-२००१ साली केलेल्या माझ्या आत्मबलाची प्रकर्षाने आठवण झाली.... संपुर्ण आत्मबल वर्ग डोळ्यासमोर आला... ते आईचे पहिल्या दिवशीचे बोल... आईचा आपल्या आत्मबलमधील प्रत्येक लेकींचा विचार करून त्यांचा विकास होण्यासाठी झटणॆ, प्रत्येकीला आई पुर्ण अनुभवायला मिळते... संपुर्ण आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी देऊन शेवटी अशा कार्यक्रमाने आत्मबलच्या वर्गाची सांगता होत असते... आपल्या लेकींना शिकवून, सवरून त्या राजहंसाप्रमाणे आकाशात भरारी घेण्यासाठी सज्य करते.
प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम हा आधीपेक्षा चांगलाच होत जातो. आईने आतापर्यंत राखलेला आत्मबलच्या स्नेहसंमेलनाचा चढता क्रम चांगलाच दिसून येत... मग गर्वाने मन फुलून येते आमची आईच ना ती... आमच्यासारख्या लेकींवरच्या प्रेमानेच ती सर्व करत असते... प्रत्येक स्नेहसंमेलनासाठी ती स्वत: अथक प्रयत्न घेत असते... आणि तिचे ते प्रयत्न त्या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिले की दिसून येतात... रात्रीचा दिवस करून ती आपल्या लेकींचा कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून राबत असते... तिचे कष्ट पाहिले की जाणवते आपण थोडशा कामाचा कीती बाऊ करतो ते... खरचं सांगते इतक्या सर्व बायकांना एकत्र करून त्यांच्याकडून असा कार्यक्रम करून घ्यायचे हे फक्त आणि फक्त तिलाच जमू शकते...
या वर्षीचाही संपुर्ण कार्यक्रम खूपच चांगलाच झाला प्रत्येक नाटक त्यातील प्रत्येक भूमिका इतक्या चपलख बसल्या होत्या की असे वाटले प्रत्येकाची भूमिका त्या त्या सखींसाठीच बनविली होती की काय? म्हणजेच ते नाटकात भाग घेन नसून खर्या ते नाटक जगताहेत असेच वाटत होते. आम्हा प्रेक्षकांनाही खरी घटनाच घडते आहे असेच वाटत होते. शिवाय प्रत्येक नाटक किंवा डान्स मध्ये आपल्या सर्वांना घेण्यासाठी बोध होता. तो प्रत्येक बोध हा हृदयाला भिडून जात होता...
खूप खूप अंबज्ञ आई.. असेच आम्हाला वर्षानुवर्षे चढत्या क्रमाचे स्नेहसंमेलन पहायला मिळू हीच बापू, आई आणि दादांकडे इच्छा व्यक्त करते...
हरि ॐ
Ambadnya Aai ..tuzhi afat mehnat hya saglyasathi karnibhut aahe...aamhi fakt tuzhyach aadnyet rahu Aai...love u Mom
ReplyDeleteAmbadnya Sakhi !Aatmabal hey apkye agde khup mulyache punje ahey .hey fakta Aai ch karu shaktay. Aple Aai. Nandai.Ambadnya.
ReplyDelete