You MUST Visit Pujya Samirdada's Blog - http://aniruddhafriend-samirsinh.com

Tuesday, December 15, 2015

देऊळ बंद

गेले कित्येक दिवस कुठलाही चित्रपट पहाण्याचा योग आला नव्हता.. किंबहुना आणलाच नव्हता... आमच्या घरात चित्रपटाचे खास आकर्षण कोणालाच नाही... परंतु खूप चांगला चित्रपट आहे असे इतरांकडून कळले की मग तो चित्रपट पहाण्यासाठी जायचे... परंतु एकदम क्वचितच.... खास काही कारण नाही पण असे होते खरे....

काही दिवसांपूर्वी मैत्रिणीकडून कळले की ‘#देऊळ_बंद’ चित्रपट आला आहे खूप चांगला आहे.... थोडीशी कथाही ऐकली आणि वाटले आपण नक्कीच पहायचा... आणि ‘देऊळ बंद’ हा चित्रपट पाहिला अपेक्षेपेक्षा खूपच आवडला... चित्रपटाचे सादरीकरणही खूप छान आहे, कथा ही छान आहे आणि मुख्य म्हणजे स्वामी समर्थ एकदम एप्ट वाटतात....


अर्धा चित्रपट होईपर्यंत राघव शास्त्रीबाबत मोठा प्रश्न पडतो की, का इतका हा #स्वामी_समर्थांचा राग राग करतो नुसता प्रश्नच नाही तर रागच येतो... पण नंतरचा अर्धा चित्रपट पहायला तर खरी मजा येते.... 
राघव शास्त्री हा एक उच्चशिक्षीत, हुशार, स्वत:च्या कर्तव्यावर विश्वास असणारा परंतु देवावर श्रद्धा नसणारा असा असतो. त्याच्या या नास्तिकतेचे रुपांतर आस्तिकतेमधे करून घेणारा असा हा चित्रपट आहे... हा विषय काही नवीन नाही.... असे अनेक चित्रपट आधीही झाले आहेतच परंतु तरीही असे सांगावेसे वाटते की.... हा चित्रपट बघणार्‍या नास्तिकालाही आस्तिक बनविण्याचे सामर्थ्य यात आहे.... अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालता येणे फार महत्वाचे आहे... जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते... विज्ञान आणि अध्यात्माचा परस्पर संबध खूप चांगल्याप्रकारे मांडण्यात आला आहे.

राघव शास्त्री याला आधी #स्वामी #समर्थ अजिबात पटत नसतात. त्यांच्याबद्दल राग असतो. अगदी त्याच्याबरोबर सतत राहून त्याला त्यांच्या अस्तित्वाची आणि प्रचितीची कल्पना मिळूनही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. त्याच्यासाठी काय काय केले या स्वामी समर्थांनी - अक्षरश: त्याची गाडीही चालविली, आईचा नवसही फेडून घेतला, त्याचे अनेक संकटांपासून संरक्षणही केले, मार्गदर्शनही केले, पासवर्डही दिला. पण जेव्हा त्याला स्वामी समर्थांचे खरे महत्व कळून येते तेव्हा मात्र त्याला आपल्या सर्व चुका जाणून येतात. तेव्हा स्वामी समर्थ दर्शन देऊन निघुन जातात ते त्याच्या मनावर श्रद्धावानाचा कायमचा छापा पाडूनच. खरोखरच सर्वांनी बघण्यासारखाच हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment