Monday, February 9, 2015
आत्मबल स्नेहसंमेलन - २०१५
प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम हा आधीपेक्षा चांगलाच होत जातो. आईने आतापर्यंत राखलेला आत्मबलच्या स्नेहसंमेलनाचा चढता क्रम चांगलाच दिसून येत... मग गर्वाने मन फुलून येते आमची आईच ना ती... आमच्यासारख्या लेकींवरच्या प्रेमानेच ती सर्व करत असते... प्रत्येक स्नेहसंमेलनासाठी ती स्वत: अथक प्रयत्न घेत असते... आणि तिचे ते प्रयत्न त्या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिले की दिसून येतात... रात्रीचा दिवस करून ती आपल्या लेकींचा कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून राबत असते... तिचे कष्ट पाहिले की जाणवते आपण थोडशा कामाचा कीती बाऊ करतो ते... खरचं सांगते इतक्या सर्व बायकांना एकत्र करून त्यांच्याकडून असा कार्यक्रम करून घ्यायचे हे फक्त आणि फक्त तिलाच जमू शकते...
Monday, December 15, 2014
Friday, July 4, 2014
Friday, June 6, 2014
Tuesday, August 27, 2013
‘नॅनोदय’
॥ हरि ॐ ॥
‘डिजिटल फोर्ट्स’ हे पुस्तक वाचून झाल्यावर मग डॅन ब्राऊनची एकूण चार पुस्तके आहेत आणि बापूंनी ती चारही वाचायला वाचायला सांगीतले ते मला कळले.... म्हणून पुढच्या तिन पैकी कुठले मिळते ते पाहू लागली परंतु तेव्हा ती तिनही पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती.....
शेवटी एक दुसरेच पुस्तक हाती लागले..... तेही म्हटले वाचावे जोपर्यंत ती तीन पुस्तके मिळत नाही तोपर्यंत हे वाचून काढावे म्हणून सुरू केले..... ते म्हणजे
अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक - ‘नॅनोदय’
२) ‘नॅनोदय’
२८२ पानांचे हे पुस्तक लिहीताना लेखकांनी खूप प्रयत्न घेतले असल्याचे दिसून येते..... तसेही मी असे ऐकले की हे लेखक आधीच चांगल्या पुस्तकांसाठी फेमस आहेत.... पण मी काही पुस्तके न वाचल्याने त्याचा अनुभव घेतला नव्हता तो आता घेतला..... हे पुस्तक लिहीण्यासाठी त्यांनी ५२ पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे....
या पुस्तकाबद्दल मी काय म्हणावे.... खूप छान असे माहीतीपर असलेले हे पुस्तक आहे.... अगदी या क्षेत्राचा काहीही गंध नसलेल्यांनाही हे पुस्तक सहजपणे कळून येते..... इतक्या सोप्या भाषेत आणि सुंदरपणे सादर केलेले आहे... वाचताना प्रत्येकवेळी कुतूहल मिश्रीत शंका सुद्धा वाटायच्या..... खरचं शक्य होईल का हे सर्व..... पण एक मात्र नक्की कळून चूकले की नॅनोटेक्नॉलॉजी ही आता हळू हळू विस्तृत होत चालली आहे..... त्याचे महत्वही खूप वाढले आहे..... नॅनोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांना तर याबाबतीत खात्रीच आहे.... ते अगदी जोमाने कामाला लागले आहेत.... आपल्याला याची फारशी कल्पनाही नव्हती.... निदान मला तरी नव्हती....
सुक्ष्मातीत सुक्ष्म कणांचा प्रताप आहे हा....
मी तर या पुस्तकामुळे नॅनोटेक्नॉलॉजीने एकदम भारावून गेले आहे.... मला एकदम स्वप्नातच असे काही पहाते असेच वाटले.... पुस्तकाचे नाव ‘नॅनोदय’ आणि त्याच्या लगेचच खाली लिहीले आहे ‘नॅनोटेक्नॉलॉजींच्या अतिसूक्ष्म दुनियेची रोमहर्षक सफर’..... त्या प्रमाणेच माझी ही रोमहर्षक सफरच झाली आहे.... खूप छान वाटले हे पुस्तक वाचून आणि मी त्या येऊ घातलेल्या नॅनो जगताची आतुरतेने वाट बघणार आहे.....
हे पुस्तक वाचले आणि लगेचच एका गुरुवारी बापूंनी नॅनोटेक्नॉलॉजीचा उल्लेख केला..... तेव्हा असे वाटले खूप बरे झाले मी हे पुस्तक वाचले.....
॥ हरि ॐ ॥
Wednesday, August 21, 2013
डिजिटल फोर्ट्स - डॅन ब्राऊन
कधी वाचनाचे वेड मला लागलेच नाही..... किंबहूना तसा कधी प्रयत्नही केला नाही..... मी एक आर्टसची विद्यार्थी.... BA Bed केले पण तरीसुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त कुठली जास्त पूस्तक वाचलीच नाही.... आणि त्याबद्दल कधी वाईटसुद्धा वाटायचे नाही... आपले काही चुकले असेही कधी वाटले नाही.... पण आता जेव्हा कळते कि बापूंना वाचायला फार आवडते.... ते म्हणतात जर वाचन केले नाही तर जनरल नॉलेज कसे वाढणार?.... म्हणूनच बहुदा माझे जनरल नॉलेज फारच कमी आहे.....
खरं तर office, घर इ. सर्व जवाबदार्या सांभाळून आता मला कसे जमणार पुस्तके वाचायला असे वाटले होते..... किंबहूना जमणारच नाही ही खात्रीच होती.... तरी बापूंनी सांगितले म्हणजे केलेच पाहिजे हा निर्धारच केला....
शेवटी मी वाचनास सुरुवात केली आणि हळू-हळू एक एक पुस्तक वाचायला लागले.....
प्रथम मी ‘डिजिटल फोर्ट्स’ या पुस्तकाचे नाव बापूंच्या तोंडातून ऐकले.... म्हटले हे वाचायलाच पाहिजे..... वाचायला कुणाकडे मिळत नव्हते..... विचार केला की, बापू जी-जी पुस्तके वाचायला सांगतील ती आपल्याकडे संग्रही असायलाच हवी नाही का?.... आणि मग लगेच आणायला सांगितले.... आणि मला ‘डिजिटल फोर्ट्स’ लगेच मिळालेही.... अंबज्ञ..... चांगले काम करायला घेतले की त्यासाठी बापू संधी उपलब्ध करून देतोच...
१) डिजिटल फोर्ट्स - डॅन ब्राऊन
अनुवाद - अशोक पाध्ये
अद्यावत टेक्नॉलिजीची ओळख या पुस्तकात होते.... या आधी कधी इतकी या क्षेत्राची व्यापकता आहे याची कल्पनाही नव्हती.... मेल वर आपला मचकूर कोणाला कळू नये यासाठी सांकेतीक भाषा आणि कोड याचा वापर केला जातो.... ते सांकेतिक कोडची उकल काढायचा प्रयत्न कशाप्रकारे होते.... इ. बर्याच बाबी या पुस्तकातून खूप चांगल्या प्रकारे समझल्या.... डॅन ब्राऊनची पुस्तके छानच असतात..... त्यात पुस्तकाचे भाषांतरही छान केले आहे..... वाचताना पुस्तकाशी अशी काही लिंक लागली जाते.... की पुस्तक सोडायची इच्छाच होत नाही.....
कॉम्पूटर मधील खास काही माहीती नसणार्यालाही सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकात मांडल्याप्रमाणे अमेरिकेने देशाच्या सुरक्षेसाठी किती व कशा प्रकारे प्रयत्न करत असतात ते कळून येते. याची इतर देशातील बहुतांशी लोकांना कल्पनाही नसावी. बापूंनी वाचायला सांगितले म्हणून हे पुस्तक वाचले. नाहीतर या पुस्तकाबाबत काही माहीतीही नव्हते.
हे पुस्तक वाचल्यापासून आता याबाबत अनेक बातम्या बाहेर आल्या पण त्याआधी मात्र या बाबतीतील जास्त काही प्रसिद्ध झालेले ऐकण्यात किंवा वाचनात आले नव्हते. ह्या पुस्तकामुळे कळले की आता टेकनॉलॉजी किती पुढे चालली आहे. अशा प्रकारची पुस्तके वाचली तरच आपल्याला अशा विविध टॆक्नॉलॉजींची आपडेटेड माहीती मिळत राहील.
अमेरिकेतील नागरिक आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कीती झटत असतात ना?
हे पहिले पुस्तक हातात घेतले आणि वाचनाचा काय आनंद असतो याची जाणिव व्हायला लागली..... वाचनाने किती अफाट ज्ञान मिळते.... ते आपल्याला सामान्य जीवनाशी सुद्धा निगडित व उपयोगी असे असते..... तेव्हा फार जाणवले शिक्षणाच्या दरम्यान किती वेळ होता..... तेव्हा तो वेळ काही वाचनात घालवला असता तर किती पुस्तके वाचता आली असती.... पण असो आता तरी शक्य होतील तेवढे वाचन करायचेच.....
शेवटी कसे आहे की बापूंनी सांगितले ना मग तो ते तडीस नेण्यास तोच मदत करतो... एवढेच नाही तर स्वत:च करून घेतो.....
Subscribe to:
Posts (Atom)