You MUST Visit Pujya Samirdada's Blog - http://aniruddhafriend-samirsinh.com

Friday, June 6, 2014

Ramanavami Palana Video

हरि ॐ


अविस्मरणीय असे क्षण.... जे माझ्या जीवनातील महत्वाची ठेव आहे...



Tuesday, August 27, 2013

‘नॅनोदय’

॥ हरि ॐ ॥


‘डिजिटल फोर्ट्स’  हे पुस्तक वाचून झाल्यावर मग डॅन ब्राऊनची एकूण चार पुस्तके आहेत आणि बापूंनी ती चारही वाचायला वाचायला सांगीतले ते मला कळले.... म्हणून पुढच्या तिन पैकी कुठले मिळते ते पाहू लागली परंतु तेव्हा ती तिनही पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती.....

शेवटी एक दुसरेच पुस्तक हाती लागले..... तेही म्हटले वाचावे जोपर्यंत ती तीन पुस्तके मिळत नाही तोपर्यंत हे वाचून काढावे म्हणून सुरू केले..... ते म्हणजे
अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक - ‘नॅनोदय’


२) ‘नॅनोदय’


२८२ पानांचे हे पुस्तक लिहीताना लेखकांनी खूप प्रयत्न घेतले असल्याचे दिसून येते..... तसेही मी असे ऐकले की हे लेखक आधीच चांगल्या पुस्तकांसाठी फेमस आहेत.... पण मी काही पुस्तके न वाचल्याने त्याचा अनुभव घेतला नव्हता तो आता घेतला..... हे पुस्तक लिहीण्यासाठी त्यांनी ५२ पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे....

या पुस्तकाबद्दल मी काय म्हणावे.... खूप छान असे माहीतीपर असलेले हे पुस्तक आहे.... अगदी या क्षेत्राचा काहीही गंध नसलेल्यांनाही हे पुस्तक सहजपणे कळून येते..... इतक्या सोप्या भाषेत आणि सुंदरपणे सादर केलेले आहे... वाचताना प्रत्येकवेळी कुतूहल मिश्रीत शंका सुद्धा वाटायच्या..... खरचं शक्य होईल का हे सर्व..... पण एक मात्र नक्की कळून चूकले की नॅनोटेक्नॉलॉजी ही आता हळू हळू विस्तृत होत चालली आहे..... त्याचे महत्वही खूप वाढले आहे..... नॅनोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांना तर याबाबतीत खात्रीच आहे.... ते अगदी जोमाने कामाला लागले आहेत.... आपल्याला याची फारशी कल्पनाही नव्हती.... निदान मला तरी नव्हती.... 
सुक्ष्मातीत सुक्ष्म कणांचा प्रताप आहे हा.... 

मी तर या पुस्तकामुळे नॅनोटेक्नॉलॉजीने एकदम भारावून गेले आहे.... मला एकदम स्वप्नातच असे काही पहाते असेच वाटले.... पुस्तकाचे नाव ‘नॅनोदय’ आणि त्याच्या लगेचच खाली लिहीले आहे ‘नॅनोटेक्नॉलॉजींच्या अतिसूक्ष्म दुनियेची रोमहर्षक सफर’..... त्या प्रमाणेच माझी ही रोमहर्षक सफरच झाली आहे.... खूप छान वाटले हे पुस्तक वाचून आणि मी त्या येऊ घातलेल्या नॅनो जगताची आतुरतेने वाट बघणार आहे.....

हे पुस्तक वाचले आणि लगेचच एका गुरुवारी बापूंनी नॅनोटेक्नॉलॉजीचा उल्लेख केला..... तेव्हा असे वाटले खूप बरे झाले मी हे पुस्तक वाचले.....

॥ हरि ॐ ॥

BOOKTIONARY PUBLISHING HOUSE



A grand inauguration function was held in the presence of Param Poojya Bapu, Nandai and Suchitdada to mark the release of  the first set of books titled ‘Sai for Me’ from the series, ‘Happy English Stories’.





































Wednesday, August 21, 2013

डिजिटल फोर्ट्स - डॅन ब्राऊन

कधी वाचनाचे वेड मला लागलेच नाही..... किंबहूना तसा कधी प्रयत्नही केला नाही..... मी एक आर्टसची विद्यार्थी.... BA Bed केले पण तरीसुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त कुठली जास्त पूस्तक वाचलीच नाही.... आणि त्याबद्दल कधी वाईटसुद्धा वाटायचे नाही... आपले काही चुकले असेही कधी वाटले नाही.... पण आता जेव्हा कळते कि बापूंना वाचायला फार आवडते.... ते म्हणतात जर वाचन केले नाही तर जनरल नॉलेज कसे वाढणार?.... म्हणूनच बहुदा माझे जनरल नॉलेज फारच कमी आहे..... 

खरं तर office, घर इ. सर्व जवाबदार्‍या सांभाळून आता मला कसे जमणार पुस्तके वाचायला असे वाटले होते..... किंबहूना जमणारच नाही ही खात्रीच होती.... तरी बापूंनी सांगितले म्हणजे केलेच पाहिजे हा निर्धारच केला....

शेवटी मी वाचनास सुरुवात केली आणि हळू-हळू एक एक पुस्तक वाचायला लागले.....

प्रथम मी ‘डिजिटल फोर्ट्स’ या पुस्तकाचे नाव बापूंच्या तोंडातून ऐकले.... म्हटले हे वाचायलाच पाहिजे..... वाचायला कुणाकडे मिळत नव्हते..... विचार केला की, बापू जी-जी पुस्तके वाचायला सांगतील ती आपल्याकडे संग्रही असायलाच हवी नाही का?.... आणि मग लगेच आणायला सांगितले.... आणि मला ‘डिजिटल फोर्ट्स’ लगेच मिळालेही.... अंबज्ञ..... चांगले काम करायला घेतले की त्यासाठी बापू संधी उपलब्ध करून देतोच...

१) डिजिटल फोर्ट्स - डॅन ब्राऊन


अनुवाद - अशोक पाध्ये


अद्यावत टेक्नॉलिजीची ओळख या पुस्तकात होते.... या आधी कधी इतकी या क्षेत्राची व्यापकता आहे याची कल्पनाही नव्हती.... मेल वर आपला मचकूर कोणाला कळू नये यासाठी सांकेतीक भाषा आणि कोड याचा वापर केला जातो.... ते सांकेतिक कोडची उकल काढायचा प्रयत्न कशाप्रकारे होते.... इ. बर्‍याच बाबी या पुस्तकातून खूप चांगल्या प्रकारे समझल्या.... डॅन ब्राऊनची पुस्तके छानच असतात..... त्यात पुस्तकाचे भाषांतरही छान केले आहे..... वाचताना पुस्तकाशी अशी काही लिंक लागली जाते.... की पुस्तक सोडायची इच्छाच होत नाही..... 



कॉम्पूटर मधील खास काही माहीती नसणार्‍यालाही सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकात मांडल्याप्रमाणे अमेरिकेने देशाच्या सुरक्षेसाठी किती व कशा प्रकारे प्रयत्न करत असतात ते कळून येते. याची इतर देशातील बहुतांशी लोकांना कल्पनाही नसावी. बापूंनी वाचायला सांगितले म्हणून हे पुस्तक वाचले. नाहीतर या पुस्तकाबाबत काही माहीतीही नव्हते.

हे पुस्तक वाचल्यापासून आता याबाबत अनेक बातम्या बाहेर आल्या पण त्याआधी मात्र या बाबतीतील जास्त काही प्रसिद्ध झालेले ऐकण्यात किंवा वाचनात आले नव्हते. ह्या पुस्तकामुळे कळले की आता टेकनॉलॉजी किती पुढे चालली आहे. अशा प्रकारची पुस्तके वाचली तरच आपल्याला अशा विविध टॆक्नॉलॉजींची आपडेटेड माहीती मिळत राहील. 
अमेरिकेतील नागरिक आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कीती झटत असतात ना? 

हे पहिले पुस्तक हातात घेतले आणि वाचनाचा काय आनंद असतो याची जाणिव व्हायला लागली..... वाचनाने किती अफाट ज्ञान मिळते.... ते आपल्याला सामान्य जीवनाशी सुद्धा निगडित व उपयोगी असे असते..... तेव्हा फार जाणवले शिक्षणाच्या दरम्यान किती वेळ होता..... तेव्हा तो वेळ काही वाचनात घालवला असता तर किती पुस्तके वाचता आली असती.... पण असो आता तरी शक्य होतील तेवढे वाचन करायचेच.....

शेवटी कसे आहे की बापूंनी सांगितले ना मग तो ते तडीस नेण्यास तोच मदत करतो... एवढेच नाही तर स्वत:च करून घेतो.....

माझ्या लाडक्या आईचा वाढदिवस

माझ्या  लाडक्या  आईचा  वाढदिवस

आज १२ ऑगष्ट, आईचा तारखेने वाढदिवस..... आणि त्यादिवशी म्हणजे दिप-अमावस्या (दिपोत्सव) जो आनंद आम्ही लुटला त्याची तिव्रतेने आठवण झाली.... आहाहा काय तो दिवस होता... मस्तच.... आईला आपल्या बाळांची किती काळजी असते.... तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा ती आपल्या सर्व बाळांनाच आनंद देत असते ना.... तिच्या प्रेमाने आम्ही सर्व भारावून गेलो..... 





हरि ॐ

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’

(26 May 2013)

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ हे शिर्षकच किती समर्पक असे आहे ना! बापू तुझ्या प्रेमात न्हाऊ, तेही आयुष्यभरासाठी मस्तच... ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रमाची अनाऊनसमेंट झाली आणि कितीतरी प्रश्न डोक्यात यायला लागले.... त्याबरोबरीनेच हळू हळू एक एक रुपरेषा बाहेर येत होत्या, तस तसे त्याबद्दल कुतूहल मिश्रित आतुरता वाढत गेली... एवढे कळले की खूपच मस्त असाच असणार आहे हा कार्यक्रम.... मग काय, चातकासारखे वाट बघणे सुरु झाले..... हळू हळू हे कुतूहल शिगेला पोहोचले आणि असे वाटायला लागले की कधी एकदा २६ मे येतो आणि कधी तो कार्यक्रम पहायला मिळतो..... आतुरता अगदी शिगेलाच जाऊन पोहोचली होती....

पुढे लक्षात आले की ऊन्ह खूप कडक असणार आहे.... प्रथम हे ऐकून भितीच वाटली... कारण माझी स्कीन खूपच सेन्सेटीव्ह आहे... मला कुठलाही बदल झाला की त्याचा परिणाम माझ्या स्कीनवर प्रथम होतो... आणि उन्हात तर जर ५ मिनिटे जरी गेले तरी त्याचे झालेले इफेक्ट कित्येक दिवस तरी भोगावे लागतात.... डॉक्टरांनी तर मला ताकीदच दिली होती.... जर तुम्ही उन्हात गेलात तर मग परत तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला ट्रीट्मेंट आणि मेडिसीन चालू करावे लागणार..... मग त्या मेडिसीनचे साईड इफेक्टही भोगावे लागणार..... क्षणभर खूप भिती वाटली... पण लगेच मनात आले, बापू नक्कीच उचित तेच करतील..... त्यामुळे सेवाचा विचारही मनात आणला नव्हता.....

पण जेव्हा स्टाफ पैकी कोणास सेवा करायची आहे का असे विचारण्यात आले.... आता मात्र मला राहवले नाही.... बापूंचे नाव घेतले आणि नाव देऊन टाकले.... आपण २६ तारखेच्या आधीच एखाद्या दिवशी उन्हात जाऊन टेस्ट करावीशी वाटली पण हिमंत झाली नाही.... आणि म्हटले नको..... जे होईल ते होईल... असे म्हणून तो विचारच सोडून दिला......

हळू हळू दिवस जवळ येत होता..... उद्यावर येऊन ठेपला.... आम्ही सर्व तयारीनीशी सज्ज झालो.... ठरविलेच होते की दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सुचनांचे पालन करायचेच.... त्याप्रमाणे पाण्याची बाटली, नॅपकीन, टोपी इत्यादि सर्व घेतलेच, त्याच बरोबर जॅकेट, छत्रीही घेतली म्हटले जास्तीत जास्त काळजी घ्यायची.... उगाच त्रास नको व्हायला.....

आणि तो दिवस उजाडला..... सकाळी लवकरच उठून घरचे सर्व आटोपून.... ८.४५ ला मैदानात पोहोचलो..... पाहीले तर जास्त कोणी आलेले नव्हते... आणि एवढ्या सकाळी सुद्धा उन्ह मी म्हणत होते.... बापूचे नाव घेतले आणि म्हटले जो होगा सो देखा जायेगा.... आणि नेमून दिल्याप्रमाणे सेवा करू लागलो....

दूर दूर वरून श्रद्धावानांची गर्दी वाढू लागली..... प्रथम जेव्हा आधीच्या रसयात्रा, भावयात्रा आणि उत्सव यांचे प्रक्षेपण सुरू झाले..... श्रद्धावान एवढ्या कडक अशा उन्हाची पर्वा न करता ते सर्व क्षण अनुभवत होते..... किंबहूना आताच ते घडते आहे आणि आपण तेथे आहोत असे सर्वांना वाटत होते..... अनेक भक्तांनी तसे बोलूनही दाखविले..... आम्हालाही सेवा करताना ते सर्व बघायचा मोह आवरत नव्हता आणि सेवा मैदानातच असल्याने मधून मधून पहायला मिळत होते..... खरचं खूप छानच दाखविले जात होते..... काही वयस्कर श्रद्धावानही बिनधास्तपणे उन्हात बसून सर्व व्हिडिओज्‌चा आनंद उपभोगत होते.... एक वयस्कर जोडपे ज्यांचे वय ७० ते ७५ वर्षे असावे ते ही ते सर्व बघण्यात एकदम गुंग झाले होते..... पाहून खूपच छान वाटत होते..... पण म्हटले त्यांना जर त्रास झाला तर..... म्हणून मग त्यांच्याजवळ जाऊन त्यांची चौकशी केली..... ते म्हणाले खूप छान वाटते..... अजुन तरी काही त्रास नाही झाला..... मग समीरदादांनी सुचना केल्याप्रमाणे त्यांना सांगितले की तुम्ही थोडावेळ वरच्या बेमध्ये, जे आपण रिकामी ठेवले होते त्या मध्ये जाऊन बसा आणि मेन कार्यक्रमाच्या वेळेस मग परत मैदानात या.... प्रथम ते म्हणाले की राहूदे नको आम्हाला जिथे बापूंनी बसविले तेथे आम्ही बसू शकतो.... मग त्यांना म्हटले तुम्ही तिकडे गेलात तर उन्हाचा त्रास नाही होणार आणि पुढचा कार्यक्रमाच्या वेळेस मग तुम्ही व्यवस्थित बसू शकता नाही का?.... मग ते आपापसात म्हणाले आपण जाऊ या वरती, बेमध्ये बसूया कदाचित बापूंनीच यांना बुद्धी दिली असेल या कार्यकर्त्यांना, आपल्याला सांगायची..... आणि हेच योग्य असावे आपल्यासाठी..... आणि मग ते वर बे मध्ये जाऊन बसले आणि थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू व्हायच्या आत येऊन मैदानात परत बसले.....

हळू हळू वेळ पुढे पुढे सरकत होता.... सर्वांनाच आपल्या परम पुज्य बापू, आई, आणि दादांच्या आगमनाची उत्सुकता होती.... आणि एवढ्या दिवसांची प्रतिक्षा संपली.... एवढे दिवस आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आला आणि परम पूज्य बापू, आई, दादांचे आगमन झाले..... आहाहाऽऽ काय ते रूप..... तिघेही मस्त गॉगलस्‌घालून आले, काय दिसत होते तिघेही..... बापू, आई आणि दादांचे ते प्रसन्न चेहरे पाहून कशी एकदम तरतरी आली.... प्रसन्न वाटले..... नवीन चैतन्य संचारले..... सगळ्यांना एकदम जोष आला.... 





कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व श्रद्धावान एकदम सज्ज होऊन बसले..... बापू, आई आणि दादांनी सर्व श्रद्धावानांना दर्शन दिले आणि..... ‘रामोराजमणि सदा विजयते....’ झाले आणि कार्यक्रमाला सुरूवात झाली.....
‘हरिरूप अनिरुद्धे पृथ्वी तत्वासी आले.....’ आहाहाऽऽऽ..... याशिवाय दुसरी चांगली सुरूवात ती काय असू शकणार.... पहील्या ह्या श्लोकीनेच आम्हाला जिंकले.... आजपर्यंत अनेक वेळा श्लोकी ऐकली होती आणि बोलली जात होती परंतु त्यातील खरा अर्थ हा त्यादिवशीच कळाला..... विनया पातडेच्या आवाजातील ती आर्तता समझून येत होती......

 ‘एक वेळ तू सहजची ये रे आनिरुद्धा मम घरी....’  स्मितावीरा टोणगावकर यांनी हा अभंग खूप छान म्हटला.... खरचं या अभंगाला तर मी आपल्या लाडक्या बापूरायाला साकडच घातले की खरचं एकदा तरी तु माझ्या घरी येच..... अर्थात हे गार्‍हाणॆ काही फक्त माझ्यापुरतेच मर्यादित नसून सर्वांच्यात मनातील असेल याची मला खात्री आहे..... प्रत्येकाला आपल्या घरी बापूंनी एकदा तरी यावे असे वाटतच असणारच..... या सर्वांच्या वतीने तो अभंग बोलला जात आहे असेच वाटत होते..... मला तर त्या अभंगाच्यावेळी मी स्वत: अभंग बोलते आणि समोर बापू आहेत असेच जाणवत होते.....

आपण घातलेल्या साकड्याला जणू माझ्या बापूने.... साद घातली आणि..... ‘मला भेटण्या बापू आला.....’ आणि मला माझे बापू माझ्या घरी आलेले आहेत.... आणि ते आल्याचाच आनंद मी अनुभवत होते......

आता बापू घरी, आले भेटले आणि पुढे..... ‘बापू भेटला ज्या क्षणी.....’ बापू भेटल्यावर काय आनंद होतो तो तेथे बसल्या बसल्या अनुभवले खरचं धन्य धन्य तो बापू आणि तो कार्यक्रम, सर्वांना किती आनंद दिला......

‘माझ्या मनाची आरती.......’ खरंच बापू घरी आल्यावर.... काय करू आणि काय नको असे कोणालाही होईल, नाही का?.... अशावेळी मिनावैनीची धांदल काय असायची...... हे सर्व ऐकून होतो...... अभंग ऐकताना ते सर्व स्वत: अनुभवल्यासारखॆ वाटले.....

‘पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाची.......’ प्रांजलवीरा देशपांडेनी हा अभंग म्हटला.... आहाहाऽऽऽ.... अभंगाचा हा भावच किती सुंदर असाच आहे..... हा अभंग आधीपासूनच, खूप आवडत होताच पण तोच अभंग आज नव्याने ऐकत असल्याची जाणीव होत होती..... आणि वाटले खरेच आपल्या जीवनाचे फुल असेच बापूंच्या चरणी वहावे......
अजितसिंह पाध्ये यांनी म्हटलेला अभंग - ‘हाचि नववा नववा आगळा.....’ हा अभंग सुरू झाला आणि खरचं जाणिव झाली..... आजपर्यंत अनेक वेळा बापूंना पाहिले होते परंतु त्या दिवशीचे बापूंचे रूप खूपच वेगळे होते..... बापू काही आगळे वेगळेच वाटले..... या अभंगाने परत नव्याने बापूंची ओळख झाल्यासारखे वाटले......

‘हसला माझा देव, प्रभा फाकली क्षणात......’ हा अभंग सुरू झाला आणि स्क्रीनवर बापूंचा हसरा चेहरा पाहिला आणि..... मन परत नव्याने त्यांच्यावर फिदा झाले..... काय ते हासणे...... खरच माझा देव आहेच मुळी असा.... ज्याच्या हसण्याने क्षणात प्रभा फाकली.... रसिका गानूने म्हटलेला हा अभंग मनाला स्पर्षूनच गेला..... 

‘सावळा सुंदर, सुंदर रूपड्याचा....’ आणि क्षणात तो अभंग प्रथम जेव्हा ऐकला होता त्या वेळीचा प्रसंग संपुर्ण उभा ठाकला..... पंढरपूर भाव यात्रेचा अनुभव घेतोय असेच वाटले.... खरचं बापूंचे रूप तसेच आहे.... त्या अभंगात सांगितलेले वर्णन किती समर्पक असे आहे ना......



‘जन्म अर्धा सरला ग सरला......’ हा अभंग सुरू झाल्यावर सर्व श्रद्धावानांना हा अभंग आपल्यावरच आहे असे वाटले असणार अशी माझी खात्री आहे.... हे मी स्वानुभवावरून सागंते..... खरचं एवढा काळ गेला आणि एवढ्या उशिरा या सद्‌गुरूची भेट झाली....

‘माझे बापू मायी नंदा, मार्ग दाविती सुचीतदादा.....’ हा अभंग सचिनसिंह भाटकर यांनी खूपच छान म्हटला.... खरचं आम्हा सर्व श्रद्धावानांना बापूंच्या भक्तीच्या वाटेवर जाताना सुचितदादा मार्गदर्शक म्हणून किती कष्ट करीत असतात.... त्यांच्यामुळेच मला कुठल्या मार्गाने जायचे याची माहीत मिळत असते.... त्यांच्यामुळेच आपल्याला बापूंचा सहवास आणि अनुभूती मिळत असते....

‘सांज वेळच्या रे वार्‍या, जा रं नंदा वैनीकडे......’ रसिका गानूने हा अभंग म्हणायला सुरू केले आणि..... एकदम मन कावरे बावरे झाले...... नंदाईचा एक कटाक्ष मिळतो का ते शोधू लागले..... आधीपासूनच मला हा अभंग फार आवडतो.... अभंगाची सुरवात झाली आणि माझ्यासारख्या सर्व स्त्रियांच्या डोळ्यांतून अश्रू सुरू झाले, ते अभंग संपला तरी थांबत नव्हते.... त्या अभंगातील प्रत्येक ओळ नी ओळ माझ्याच आयूष्याशी निगडीत आहे अशी जाणिव झाली... सर्व संसार डोळ्यासमोरून सरत होता... सर्वच श्रद्धावान स्त्रियांना माझ्यासारखाच अनुभव आला असणार.... हा अभंग संपला आणि ब्रेक झाला..... असे वाटले की जराही हलू नये, बोलू नये आणि काहीच करू नये फक्त शांत बसून रहावे.... पण सेवा होती त्यासाठी मग लवकरच नॉर्मल व्हावेच लागले......


यानंतर interval होता. त्या मधल्या वेळात जागेवरून उठणार्‍यांची संख्या फारच कमी होती..... उठले तेही लगेचच येऊन आपापल्या जागांवर परत येऊन बसले..... या अख्या कार्यक्रमात ही एक खूप महत्वाची गोष्ट होत होती ती म्हणजे..... जो तो आपापली जागा पाण्याची बाटली, रूमाल, टोपी, पेपर अशा कोणत्याही वस्तूने अडवून गेले होते परंतु.... कोणीही त्या जागांना हात लावला नाही..... कुणालाही काही अडचणी आल्या नाहीत की काही चिडाचिड झाली नाही.... सर्व कसे मस्त शिस्तीत आणि शांततेत पार पडत होते..... सर्वांना तो ब्रेक खूपच मोठा वाटत होता.... कधी परत लवकर कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे आणि तो कधीच संपूच नये.....



ब्रेकनंतर पहिलेच.... ‘न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेम सागरा....’ सुरू झाले..... हा आधी सुद्धा प्रोमोज्‌मध्ये ऐकल्याने फार जवळचा वाटत होता..... खरतर हा अभंग सर्व गायकांनी एकत्र गायला पण कुठेच त्यात एको किंवा कोणी पुढे किंवा पाठी बोलत नव्हते सर्व जण एका सुरातच गात होते..... अगदी लहान थोर सर्वच श्रद्धावानही त्यात सुर मिळवून गात होते..... खूपच छान वाटत होते.....

‘दहा दिशांनी विस्कटलेली जिवनाची घडी.....’ आणि...... ‘सुकराचे लेकरू मस्त वोरडा घातला....’ हे दोन्ही अभंग ऐकताना जाणवत होते हे, तर माझ्यावरच आहेत.... यात माझीच कहाणी आहे..... आपली ही विस्कटलेली घडी..... बापूंमुळेच सुरळीत चालू आहे..... आता सुकाराप्रमाणे वागून चालणार नाही.....

‘तुम बीन कौन सहारा बापू, तुम बीन कौन सहारा....’, आणि ‘अनिरुद्ध तेरी दुनियामे, मुझको भी पनाह लेना....’, हे दोन अभंग झाले, तेव्हा आपल्याबरोबर इतर भाषेच्या लोकांनासुद्धा ऐकायला खूप मस्त वाटले असेल नाही का?..... असेच अजून हिंदी अभंग कोणाला सुचले तर किती छान होईल ना.... मग संपूर्ण भारतात बापूंवरील गाणी, अभंग इत्यादि सर्व भक्तांना ऐकायला मिळेल..... त्यांना याचा किती आनंद होईल नाही का.....

‘सद्गुरू दारीचा आहे मी हो श्वान.....’ हा अभंग सुरू झाला.... आणि सद्‌गुरूच्या घरचा श्वान होणे सुद्धा किती मोलाची गोष्ट आहे..... श्वानाचेही काय भाग्य ना...... त्या श्वानाचाही काय भाव आहे..... की त्या श्वानासाठी बापू स्वत: भाकरी वाढतो...... धनीच श्वानाचे रक्षण करतो.... बापूंच्या चरणाचा जास्तीत जास्त सहवास श्वानास होतो..... तोच त्याचा छंद असतो..... अशा या सद्‌गुरू दारीचा श्वान बनण्याचे भाग्य जन्मोजन्मी लाभावे अशी बापूंच्या चरणी सर्वांनीच इच्छा व्यक्त केली असेल..... अशा ह्या श्वानावर बापूंचेही किती प्रेम..... आईही स्क्रीन वर गुड्डूचा फोटो पाहून एकदम गहीवरली..... तिला पाहून वाटत होते की त्या श्वानाचे कीती भाग्य ना..... बापूंनी तिला आधार दिला, तेव्हा ती माऊली शांत झाली..... या अभंगामुळेच आम्हाला सद्‌गुरूंच्या दारातील श्वान आणि त्याचे प्रेम कळून आले...... धन्य तो श्वान आणि धन्य तो धनी.......

सर्वच अभंगाबद्द्ल लिहीत बसले तर मग हे लिखाण कधी पूर्णच होणार नाही..... या प्रेमसागरातील प्रत्येक अभंग रुपी थॆंब हा तितकाच महत्वाचा आहे...... प्रत्येक अभंगाबद्दल लिहावसे वाटत आहे पण शक्य नाही म्हणून काही अभंगांचा फक्त उल्लेखच करत आहे.....
तिमिरातुनी पसरुनीया बाहू, आले ते उजळीत......, विश्वावरचे पाऊल तुझे चालतची राही सतत......, हरिवरा तू सांग कैसा राहसी भक्ता घरी......, यांनी म्हटलेले नाम घ्यावे म्हणूनी मिटता रे डोळे......, तुझ्या चरणाची धूळ हेची माझे गोत्र कूळ......, सहज सुख तुझ्या नामे आम्हा हेची एक धर्म......, तू दयेचा अपार सागर, तू करुणेचा भव सरोवर......, श्यामल सुंदर, हृदयी पळभर शुध्द जाहली काया......, आहे भक्ता तारण्या सिद्ध माझा अनिरुद्ध......, जप जप मेरे मनवा जप रे जप रे......, पिपा म्हणे माझी कोरी ढोर वाट......, साई मागे दोन नाणी......, बापूला माझ्या प्रेमाची तहान......, आली लहर लेकर होऊन, या सद्‌गुरू नामाची हो नामाची....., जे आले ते तरुनी गेले, जे न आले ते तसेच राहिले....., धरलेले सोडू नको रे, जोडलेले तोडू नको रे......, बापू पायी ठेऊ एकविध भाव, नको धाव धाव अन्य कोठे......, अनिरुद्ध रायाशी लागतो रे माझा लळा, कुणा नाही इतुके कौतुक......, साकार सगुणा क्षमावंत देवा......, सावळ्या रे घन निळ्या नको दुर ठेऊ......, उडू रे लावूनिया पंखू, माझिया सावळ्या भेटू......, तुझ्यासाठी बापू करीतो प्रयास......, नाम घेता ऊरापोटी ब्रम्ह धरिते आकृती......, सामोरी बैसला कैसा, मज दिसला बापूराया......, सद्गुरू दारीचा आहे मी हो श्वान......, पिपा तुझा दास बापू तुझी आस......, युगे युगे मी मार्ग चाललो फक्त तुझा बापू......, देवयान पंथी पार्थाचा सारथी......

प्रत्येक अभंग, गाणं हे छानच होते.... मस्तच होते.... कुठलाही अभंग आवडला नाही असे नाही...... किंबहूना प्रत्येक अभंगामुळे मला बापूंच्या जवळ जाता आले.... सर्वच अभंगामुळे मला माझा बापू नव्याने कळला..... जगण्याला एक नवीन आनंद प्राप्त झाला.....

आणखी एक महत्वाचे म्हणजे निवेदन..... काय ते निवेदन होते..... क्लासच होते..... निवेदन हे एकदम उच्च श्रेणीतील असे होत..... तरीही सर्वांना सहज समजेल अश्या सोप्या शब्दात मांडले होत..... हे निवेदन गौरांगसिंह यांनी त्यांच्या दमदार आवाजात सादर केले होते..... प्रत्येक अभंगानंतर असलेल्या निवेदनामुळे येणार्‍या अभंगाची काय मजा सांगू..... निवेदनामुळे आम्हा श्रद्धावानांना येणारा अभंग कोणता आहे याचा अंदाज बाधण्याचा जणू छंदच लागला होता.... आणि येणार्‍या अभंगाविषयी आतुरता वाढायची..... निवेदनात बोलले जाणारे जणू प्रत्येक भक्ताच्या मनातील बोलच वाटत होते..... नंतर समजले की, ते सर्व स्वप्निलसिंह यांनी लिहीले होते..... मग बरोबरच आहे, ते तेवढे चांगले होणारच नाही का?..... सच्च्या श्रद्धावानाने भक्तीच्या मार्गाने कसा प्रवास करावा याचे एक मुर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वप्निलसिंह.....

प्रत्येक अभंगाबरोबरीने सर्व स्क्रीनवर जे वेगवेगळे समर्पक फोटो दाखविले जात होते..... ते फोटो पाहून खूप खूप मस्त वाटत होते..... प्रत्येक फोटोबरोबर त्यावर फोटोशॉपमध्ये घेतलेली मेहनत दिसत होती.... प्रत्येक फोटो निवड करताना खूप विचार केलेला दिसत होता.... शांत पणे बापूंना पहात पहात प्रत्येक अभंगाचा आनंद घ्यायला मिळत होता...... प्रत्येक अभंगाचा क्रम बनवितानाही किती खोलपर्यंत विचार केला आहे ते समजत होते..... एका अभंगातून दुसर्‍या अभंगाकडे जाताना जशी कथा पुढे सरकते त्याप्रमाणे प्रत्येक श्रद्धावानांचा प्रवास कसा मस्त फुलत चालला होता....

‘आता नको नाती सारी, नाती सारी......', ‘सर्व जगी आम्हा बापूंचा आधार.....’, ‘सब सौप दिया है जिवन का अब भार तुम्हारे हाथों मे....’ शेवटच्या तीन अभंगांनी तर कार्यक्रमाला मुकूटच घातला..... या अभगांविषयी काय वाटले ते मी कोण सांगणार.... आपल्या जिवनात आपण बापूच्या भक्ती ने काय काय करू शकतो ते कळले..... कितीही नातेवाईक असले तरी आपल्याला संकटकाळी आणि जन्मोजन्मी साथ देणारा हा आपला सद्‌गुरू बापूच असतो.... प्रत्येक वेळी आपल्याला त्याचाच आधार असतो.... अशा प्रकारे प्रेमाची यात्रा अंतीम स्थळी आले असता.... आपण आपल्याला संपुर्णपणे बापूंकडे सुपूर्द केले.... किती छान कल्पना आहे ना...... या प्रार्थनेच्या वेळेस मला वाटते, क्वचित श्रद्धावान असतील की ज्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रु आले नाहीत.... आणि एकही श्रद्धावान असा नसणार की ज्याचे या विश्व प्रार्थनेने हेलावून गेला नाही........

कार्यक्रम संपला आणि सर्व श्रद्धावान हे एकदम शांत..... नि:शब्द असे झाले..... जो तो काहीही बोलण्याच्या मनस्थितितच नव्हता..... आणि नेमक्या याच क्षणी अनिरुद्ध प्रेमसागरातील अवघे, अगदीच अवघे काही थेंब आम्हा श्रद्धावानांच्या अंगावर पडले..... प्रत्येक जण त्या थॆंबांनी भारावलेला होता...... आणि श्रद्धावानांना एकदम भरून आले..... वेळ झाली होती त्यामुळे हळू हळू सर्व उठून निघून जाऊ लागले पण आवाज मात्र कोणाचाही येत नव्हता...... थोड्या वेळाने लक्ष गेले तर स्टेडियम बर्‍यापैकी रिकामी वाटत होते.... एवढी गर्दी रिकामी होत होती परंतु जराही आवाज येत नव्हता....

या सगळ्या अभंगातील भाव आणि तिव्रता पाहून मन एकदम भरून आले.... आणि आपण कुठे आहोत याची जाणीव झाली.... स्वत:ला सेवेकरी म्हणवून घ्यायला जो आनंद होत होता ते सर्व विरून गेले...... सेवा करताना कुठे तरी एखादा धागा (भक्ती भावाचा) सैल होत चालला होता याची जाणिव झाली... खरचं आपल्याला सेवेची एक प्रकारची धुंदीच चढलेली होती..... ते आपल्या बापूंना कसे आवडेल?.... त्याला आपला विकासच करायचा आहे ना.... आपण कुठे तरी कमी पडतो..... आणि त्याची दखल तो कशी बरी घेणार नाही?..... आणि त्याने ती घेतलीच..... म्हणूनच ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ हा कार्यक्रम घडून आला..... त्यामुळेच कळून चूकले की सेवेला भक्ती भावाची जोड नसेल तर त्या सेवा बापूला भावणारच कशी?..... खरचं हा जर असा अभंगाचा कार्यक्रम झाला नसता तर मला याची जाणिवच झाली नसती..... या कार्यक्रमाद्वारे आपल्याला वेळीच जागे केले....

असे अजून नविन नविन अभंग आले तर काय मजा येईल ना..... आणि असे अभंगांचे कार्यक्रम आपण उपासना केंद्रावरही करू शकले तर कीती मस्त ना..... अजुन नवीन नवीन अभंग ही ऐकायला मिळतील आणि..... नवीन नवीन श्रद्धावान गायक पुढे येतील ना.....



खूप खूप अंबज्ञ बापूराया.....

सब सौप दिया है जिवन का अब भार तुम्हारे हाथों मे
चाहे हार मिले या जित मिले उपहार तुम्हारे हाथों ॥

एक अनुभव - grand motherचा

एक अनुभव - grand motherचा


  


परवा मिटींगसाठीम्हणून Happy Home ला गेले..... आणि काय पर्वणी..... मस्तच.... माझ्यासाठी मिटींच्या निमित्ताने मिळालेले ग्रॅन्ड सेलिब्रेशनच होते..... 
मी मुलाच्या परिक्षेमुळे जरा टेंशनमध्येच होते त्यात त्याला एक पेपर जरा जड गेला त्यामुळे जरा जास्तच भिती वाटत होती..... पण आई आणि मामांना मी अशी राहीलेली कसे आवडेल नाही का? त्यांनी लगेच मला मिटींगला बोलावून घेतले.... रोहनच्या Geometryच्या पेपराच्या दिवशी मिटींग होती.... निघाले  ते त्याच्या पेपराची मनात भिती घेऊनच.... 

मी सध्या रजेवर असल्याने रोहन पेपराला बसलेला असताना घरी श्रीगुरुक्षेत्रमंत्राचे पठण करायची..... त्या दिवशी मिटींगमुळे माझे पठण अर्धेच रहाणार असे क्षणभर माझ्या मनात येऊन गेले.... पण लगेच जाणीव झाली की मी मिटींगच्या निमित्ताने मी श्रीगुरुक्षेत्रम्‌ मध्येच जाणार नाही का..... म्हणजे त्याला त्याचा नक्की फायदाच होणार...... अशा निर्धाराने मी निघाले..... प्रवासात थोडी रखडपट्टी झाली शंका आली की मला लेट होतो की काय?... पण नाही जेमतेम ५ मिनिटे आधी पोहोचले आणि हुश्श्श्श केले..... 
तेथेच आम्हाला पौरससिंहची न्युज कळली.... मस्तच.... आम्ही सगळ्यांनी त्यांना तिकडेच अभिनंदन केले..... तेवढ्यात मिटींगसाठी बोलावण्यात आले...... 

परम पूज्य सुचित दादांना मिटींग घेण्यासाठी खुर्चीत बसलेले पाहीले आणि हायेसे वाटले कारण रोहनबाबत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानेच चालत आहोत.... मी खूप प्रयत्न करीत होते मिटींगकडे लक्ष द्यायचा...पण तरीही मिटींग चालू होती आणि मधे मधे माझ्या मनात रोहनचा आता पेपर सुटेल..... त्याला कसा गेला असेल पेपर.....त्याचा पेपर वेळेत पूर्ण झाला असेल का की काही राहीले असेल?... कारण त्याचा हा सर्वात नावडता व टॆंशनचा पेपर होता....असे नानाविध विचार मनात घोळत होते.... किंबहूना भेडसावतच होते.... रोहनपेक्षा मलाच त्या पेपराचे टेंशन आले होते..... आणि अचानक मामांनी आजचा पेपर चांगला होता असे मला सांगितले..... मला पटकन कळलेच नाही मी हे काय ऐकते... शेवटी त्यांनी परत मला सांगितले की आजचा पेपर चांगला होता.... आणि त्या क्षणी मला काय बोलावे सुचलेच नाही..... अर्थात मला एकदम टेंशन रीलिज झाल्यासारखे वाटले..... त्यात मामांनी आईला भेटून जा असे आम्हा सर्वांना म्हणाले..... कशी आपली काळजी घेतात ना बघा.... आधी टेंशनमधून पण रिलॅक्स केले नंतर grand आनंद अनुभवायला दिला....

मिटींग संपल्यावर आम्ही खाली निघालो आईला भेटायला तेवढ्यात दुसर्‍या माळ्यावर ऑफिसमध्ये internal meeting आहे तिकडे आधी जायचे ठरले.... खरे तर माझे त्या मिटींगमध्ये लक्षच नव्हते एक तर खूप खूप दिवसांनी आईला बघणार होती आणि ते ही अत्यंत.... सुंदर अशा आनंदाच्या प्रसंगी..... मस्तच.... खरचं मला मी किती lucky आहे याची जाणिव झाली...... एकदम एक्साईटेड होती मी.... खाली गेल्यावर कळले आई आता थोड्या वेळावुर्वीच निघाली..... परत मन खट्टू झाले..... काय करू... आईला भेटायची संधी गेली की काय..... अशी भिती वाटली.... पण लगेच कळले की आई येणार आहे..... मग काय परत एक्साईटमेंन्ट...... मधे मी अशोकसिंहना फोन लावायचा प्रयत्न केला..... परंतु त्यांना आवाजच ऐकायला येत नव्हता... तेवढ्यात लिफ्ट वाजली.... आई आली..... आहाहाहा काय ते रुप काय ती entry.... मी फिदा झाले तिच्यावर..... म्हणजे नेहमीच फिदा असतो आम्ही पण.... परत एकदा.....मस्तच.... असे वाटले की असेच फक्त तिच्याकडॆ पहात रहावे आणि तो आनंद अनुभवत रहावे...... आम्ही सर्वांनी तिचे अभिनंदन केले.... आम्ही कोण तिला अभिनंदन करणारे.... तिच आम्हाला आनंद देते......

आई आली आणि आम्ही सारे तिचा तो आनंद, उत्साह, कौतुक आणि बरेच काही ऒसंडून वाहताना पाहत होतो...... तिच्या हालचालीतूनही आनंद ओत प्रोत भरलेला जाणवत होता..... काय ते कौतूक सुनेचे आणि मुलाचे...... तिने लगेच सर्व कामांची वाटणीसुद्धा करून टाकली...... सुनेला काय खायला द्यावे..... बाळाचे कुठले काम कोणी करायचे, कोणी घोडा बनायचे, कोणी सु-शी काढायची आणि मुख्य म्हणजे कोणी त्या बाळाला खेळवायचे..... या सर्वांचे तिने लगेच..... planing.... केलेसुद्धा..... एवढा तो आनंद अनुभवत होतो ना की असे वाटले घड्याळाचे काटे इकडेच थांबावे.

एवढेच काय तर काळ ही थांबावा आणि आम्ही तिकडून बाहेरही पडू नये.... आईने सांगितल्यामुळे आम्हाला प्रथमच grand mother या शब्दाचा अर्थ कळला...... mother चा grandness वाढतो तेव्हा ती grand mother होते म्हणजेच 'आज्जी' होते..... किती छान आहे ना..... आईचे प्रेम पाहून मला तर वाटले..... पुढे कधीतरी माझ्या आयुष्यात आज्जी होण्याचा प्रसंग मी आजच अनुभवला... मला नाही तर तिकडे असणार्‍या प्रत्येक स्त्रीला तसेच जाणवलेले असणार..... 

आईचा एवढा आनंद पाहून खूप इच्छा झाली की बापूंनाही 'आबा' झाल्याचा कीती आनंद झाला असेल तेही पहायला मिळावे.... आणि क्षणभरात 'आबा' आणि 'बाळा'चे प्रॆमही कल्पनेतून अनुभवल्यासारखे वाटले....

एकदम स्वच्छतेत काटेकोर असणारी आई.... पण आता तिची शिस्त गायब झाली होती..... ती म्हणाली आता पसारा असेल तरी मला चालेल.... उलट पसारा नसेल तर मग चुकल्यासारखे होईल......त्या बाळाने काहीही केले तरी मला चालणार आहे.... मी त्या बाळाला काहीही बोलणार नाही..... उलट बाळाच्या आई-बाबांनाच ओरडणार..... आता mother च्या आधी grand mother असणार आहे.... 

ती म्हणाली की आधी लहानपणी काही मज्जा करायची राहीली असेल.... आता मी आज्जी बनून सर्व इच्छा पूर्ण करणार..... मला आता कोणी मुलीच्या जातीला हे करायचे नाही ते करायचे नाही असे सांगणारच नाही.....

एकंदरीत तो आईचा आनंदाचा जल्लोष पाहून मी तर मलाच विसरून गेले.... असे वाटत होते... की इकडून निघूच नये..... जायची वेळ आली.... आई रूममध्ये गेली.... भरून आले तेवढ्यात आईकडे पार्टी मागायचीच राहीली असे वाटले..... तसे आम्ही बाहेर पडता पडता शर्मिलावीराला बोललो की तु आमचा निरोप सांगशील का?.... तेवढ्यात आई परत बाहेर आली आम्ही परत आत गेलो आम्ही काही बोलायच्या आत तिनेच आम्हाला विचारले की काय माझ्याकडून treat मागता काय?.... आणि आम्ही सगळ्या जणी आवाक्च झालो......

एकंदरीतच आढावा घेता परवाचा दिवसच माझ्यासाठी grandnees happy day होता....मी येताना कशी आले आणि निघताना किती आनंदात निघाले......

खूप खूप श्रीराम.......परम पूज्य बापू, परम पुज्य आई आणि परम पुज्य दादा माझ्याकडे शब्दच नाहीत आता... मी खूप खूप अंबज्ञ आहे.....

|| हरि ॐ ||